झाडावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा, पहा व्हिडिओ.
औरंगाबाद/प्रतिनिधी - राष्ट्रवाादी अल्पसंख्यांक विभागाचे बॅनर हाती घेत एक कार्यकर्ता मनपा मुख्यलायतील परिसरातील झाडावर चढून अनोखे आंदोलन करत आहे, मनपा ने जर समस्या सोडवली नाही तर झाडा वरून उडी मारून आत्महत्त्या करेल अशी चेतवनी देत आहे.
महानगरपालिका प्रशासन शहरात व वॉर्डातील मूलभूत समस्या सोडवू शकत नाही,जो पर्यंत समता नगर कोटला कॉलनी परिसरातील समस्या सोडवत नाही तो पर्यंतआंदोलनं माघे घेनार नाही असे म्हणत राष्ट्रवाादी अल्पसंख्यक विभागाचे बनर हाती घेत एक कार्यकर्ता मनपा मुख्यलायतील परिसरातील झाडावर चढून बसला आहे.
मनपा व पोलीस अधिकारी आंदोलन कर्त्याची समजूत काढन्याचा प्रयत्न करत आहेत. पण 4 वाजे पर्यंत समस्या सोडवा अन्यथा झाडावरून उडी मारुन आत्महत्या करेल असे त्या व्यक्तीने सांगितले आहे.