गुडलक पान सेंटर वर छापा,६६ हजारांचा गुटखा जप्त.

गुडलक पान सेंटर वर छापा,६६ हजारांचा गुटखा जप्त.

वाळूज महानगर -  वाळूज येथील कमळापूर रोडवरील गुडलक पान सेंटर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 66 हजार दोनशे सत्तर रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. हि हे कारवाई एनडीपीएस पथक व वाळूज पोलिसांनी गुरुवारी ( दिनांक ८) रोजी रात्री आठ वाजे सुमारास केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टपरी चालक फेरोज महेबुब शेख (२७) रा. शिवाजीनगर, वाळूज यास ताब्यात घेऊन गून्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांना माहिती मिळाली की वाळूज येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा विक्री होत आहे . पोलीस आयुक्तालयात नुकत्याच स्थापन झालेल्या एन. डी. पी. एस. पथकाचे अधिकारी हे घटनास्थळी हजर असून त्यांच्या मदतीसाठी जाण्याचे आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी आपल्या सहकार्यासह फेरोज शेख यांच्या गुडलक पान सेंटर नावाच्या टपरीवर पोहोचले होते. त्याठिकाणी पथकाचे पो उप नि शिंदे, पो ह. लालखा पठाण, पो अंबलदार त्रिभुवन, धर्मे, सतीश चव्हाण यांच्या सहकार्याने पोलीसांनी पान टपरीची झडती घेतली असता त्या ठिकाणी विविध कंपनीचे तंबाखू युक्त लोकांना अपायकारक असलेले प्रतिबंधित गुटका चे पाकिटे याचे एकूण किंमत 66 हजार 270 रुपये मिळाले आहे . त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याचे विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे करीत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा