कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

संभाजीनगर /प्रतिनिधी - कामगारदिनानिमित्त भारत विकास परिषद या सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात 40 दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना भारत विकास परिषद तर्फे प्रमाणपत्रही देण्यात आले.
यावेळी रक्तदान ही काळाची गरज असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जीवनदान द्यावे असे आवाहन अध्यक्ष अनिल सोनी, पालक गोपाल होलानी यांनी केले. दिं.5 मे ला सुधाकर नगर येथे हेडगेवार रुग्णालय ब्लड बँक व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात राम गोपाल मालानी यांनी रक्त साठवणूक या संदर्भात अनमोल अशी माहिती दिली. या कार्यक्रमात भारती भांडेकर, गोपाल काळे, उमेश मिणीयार, रमेश मंटू यांनी विशेष परिश्रम घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा