नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा-

नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा-

बजाजनगर/प्रतिनिधी:- 
सिडको वाळुज महानगर १ व २ मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहे. या समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिडको प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदने व आंदोलने करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होत आहे.त्यामुळे नागरिक समस्या संदर्भात शिवसेना आक्रमक झाले असून गुरुवार 22 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख माजी उपसरपंच विष्णू जाधव यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने सिडको चे कार्यकारी अभियंता कपिल राजपूत यांची भेट घेतली. व सिडको महानगर मधील समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात, अन्यथा प्रशासना विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे दिला. यावेळी कार्यकारी अभियंता कपिल राजपूत, 
सहाय्यक कार्यकारी अभियंता
उदयराज चौधरी यांनी शिष्टमंडळाला सिडको महानगर मधील सर्व कामाला मंजुरी मिळाली असून,लवकरच हे कामे मार्गे लावण्याचे आश्वासन दिले.       
यावेळी शिष्टमंडळाने दक्षिण मुखी हनुमान मंदिर बजाजनगर, द्वारकानगरी ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक या रस्त्याची पूर्णपणे खड्ड्यामुळे चाळण झाली आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून या रस्त्यावर दोन शाळा दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. या रस्त्याने वाहने तर दूरच पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा.याकरिता अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी असून या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून मजबुतीकरण करावे.रस्त्यावरील स्ट्रीट लाईट तत्काळ दुरुस्ती करून सुरळीत सुरू करावे.सिडको वाळूज महानगर 1 मध्ये पाण्याची टाकी,मराठा चौक,महाराणा प्रताप चौक, महाविरनगर,महाविरनगर ओपन पेज 1,2 ,सारा गौरव चौक,अहिल्याबाई होळकर चौक, सिडको गार्डन, येथे हाय मास्ट लॅम्प बसवण्यात यावे.सिडको महानगर 1,2,मध्ये पाण्याचे योग्य नियोजन करावे.सिडको महानगर मध्ये नियमित औषध व धुर फवारणी करावी. वरील सर्व समस्या सिडको प्रशासनाने तात्काळ मार्गे लावाव्यात अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे)पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता कपिल राजपूत यांना दिला. यावेळी उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे,ह.भ.प.बबनराव चौरे महाराज,यशवंत चौधरी,सत्यनारायण गगड,अंबादास गुंजाळ आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा