लातूरमध्ये प्रा. किरण पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात

लातूरमध्ये प्रा. किरण पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात

लातूर दि.२३ - मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप व  राज्य शिक्षक संघटना ,महायुतीचे उमेदवार प्रा. किरण नारायणराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात खा. सुधाकर श्रूंगारे,आमदार रमेशअप्पा कराड,माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,शैलेश भैया लाहोटी,
भाजप महानगर शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी जि. प. सदस्य राहुल भैय्या केंद्रे, संघटन सरचिटणीस दिग्विजय काथवटे, अशोक काका केंद्रे, अमोल पाटील, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, विनायक पाटील,शहर सरचिटणीस भाजप शिरीष कुलकर्णी,प्रवीण सावंत,सभापती जि प लातूर रामभाऊ तिरुके,दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, बापूराव राठोड आदींच्या उपस्थितीत सकाळी सुरू झाला.


                यावेळी खासदार सुधाकर श्रूंगारे यांनी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी  योग्य उमेदवार किरण पाटील हेच आहेत.सर्व भाजप आता सक्रियपणे कामाला लागली आहे.  विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बोलतांना आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले प्रा. किरण पाटील हे जमिनीवर राहून क्रियाशीलपणे काम करणारे आहेत.सर्वांनी एकत्र येऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        संवाद दौऱ्यात भाजप, महायुतीचे पदाधिकारी,शिक्षक संघटना शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा