ज्ञानसागर विद्यालयात कोविड लसीकरण शिबिर
औरंगाबाद/प्रतिनिधी
महानगरपालिका अंतर्गत दुधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर राबवण्यात आले.
यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिस अभिवादन करून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पार पाडण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सौ सीमाताई खरात ज्ञानसागर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा वार्ड क्रमांक 28 च्या नगरसेविका व प्राचार्य आनंदजी खरात ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री समीर खान वैद्यकीय अधिकारी चेतना नगर, वषार्ताई फुले, विवेक सुरडकर, प्रियंका ताई चव्हाण, छायाताई पवार ,अलकाताई बोरडे ,रेणुकाताई बोर्डे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम यांच्या सहयोगाने प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. यावेळी वैद्यकीय कर्मचारी (कोरोना योद्धा) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून 80 % विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.