एसी कॉम्प्रेसरचा स्फोट चार जणांचा मृत्यू

एसी कॉम्प्रेसरचा स्फोट चार जणांचा मृत्यू

एसी कॉम्प्रेसर चा स्फोट झाल्याने आग लागून एकाच परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बहादुरगड येथे एका घरात एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या अपघातात तीन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील होते.
 स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहादुरगड शहरातील सेक्टर-९ पोलिस स्टेशनजवळील एका घरात एसी कॉम्प्रेसर फुटल्याने झालेल्या स्फोटात ३ मुले आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक पुरूष गंभीर जखमी झाला. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते.
घरात आग लागली होती.
घरात एसी कॉम्प्रेसर फुटल्याने स्फोट झाला आणि घराला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत तीन मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा