मनमाडजवळ पवन एक्स्प्रेसचे 4 डब्बे घसरले रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

मनमाडजवळ पवन एक्स्प्रेसचे 4 डब्बे घसरले रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

मनमाड / प्रतिनिधी : पवन एक्सप्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर येतेय. देवळाली- लहवी दरम्यान ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यासह या अपघातादरम्यान काही प्रवाशी जखमी झाल्याची देखील माहिती समोर येतेय मात्र किती प्रवासी जखमी झाले आहेत याबद्दल नेमकीचं माहिती देण्यात आलीये. दरम्यान रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल होत लोकांना मदत करण्यास पोहोचले आहेत. 

माहितीनुसार दरभंगा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही एक्सप्रेस प्रवास करते. मात्र यादरम्यान रविवारी दुपारी या एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. रेल्वे रुळावरून चार डब्बे घसरले आहेत. डब्यामध्ये काही प्रवाशी असल्याची माहिती देण्यात आलीये. अपघातामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मात्र दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी या एक्सप्रेसचा अपघात झाला त्याठिकाणचा परिसर अज्ञात असल्याने मदत कार्य पोहोचण्यास काहीसा उशीर झाला. मात्र रेल्वे अधिकारी सर्व खबरदारी बाळगत आहेत. 

सुमारे 3 वाजून 10 मिनिटांनी ही घटना घडली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 11061 LTT जयनगर एक्सप्रेसचे डबे लहवी आणि देवळाली नाशिकजवळच्या रुळावरून घसरले आहेत. सध्या प्रवाशांना तसेच अपघातग्रस्तांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे नंदिग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा