बिडच्या घटनेची पुनरावृत्ती तरुणावर चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला

बिडच्या  घटनेची पुनरावृत्ती तरुणावर चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला

अंबेजोगाई / प्रतिनिधी -  बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मध्यरात्री ही घटना घडली आहे.चक्क पोलीस चौकीसमोरच तरुणावर चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख (रा. सदर बाजार, अंबेजोगाई) असं जखमी तरुणाचं नाव आहे, त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनू लागली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तर पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता, त्यावेळी जमीरने त्याला नकार देऊन शिवीगाळ केली, त्यानंतर रात्री 12.30 वाजता जमीर स्वाराती रुग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडेने त्याला पोलीस चौकीजवळच्या एटीएममध्ये बोलावलं. जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली असा जाब विचारला, यानंतर त्याने जमीरच्या मानेवर चाकूने वार केले तर आर्यन मांदळे आणि अनोळखी दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला.

याप्रकरणी श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे आणि अनोळखी दोघांवर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वारती रुग्णालयात उपचार सुरू 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा