वाळूज पोलिसांना दे दणा दण ... वाहतूक कोंडीमुळे घडला प्रकार... दोघां जणावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर ( पीसीएन न्युज ) छत्रपती संभाजीनगरातील वाळूज वाहतूक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना दोन व्यक्तींनी विनाकारण हुज्जत घालत लाथाबुक्यांनी मारहाण केली, नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या तावडीतून सोडवले, ही घटना एनआरबी चौकामध्ये दि २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली, याप्रकरणी दोन आरोपींवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अशोक उत्तमवराव थोरात हे वाळूज एमआयडीसी येथील एनआरबी चौक येथे आपले कर्तव्य बजावत असताना सायंकाळी ६.१० वाजता, दोन व्यक्ती अचानक थोरात यांचाजवळ येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात करून त्यांच्या घातलेल्या शासकीय गणवेश फाडून लथाणुक्यांने मारहाण करण्यास सुरुवात केली. परंतु मारहाणीमध्ये खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी त्यांच्या तावडीतून सोडवले. घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना देण्यात अली त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अंकुश रामदास आहेर वय ३६ रा शिवाना ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ह मु वडगाव कोल्हाटी अयोध्या नगर व नामदेव लक्ष्मण खंबाट वय ४६ रा म्हसला टाकळी ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ह मु गिरिराज हाउसिंग सो कामगार चौक वाळूज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन थोरात यांच्या फिर्यादीवरून भा. न्या. सं. कलम 132, 121(2), 115(2), 352, 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस करत आहे.
वाहतूक पोलिसांचा त्रास; चौकशी व्हावी
वाळूज औद्योगिक परिसरात विविध परिसरातून लोक आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कामाला आलेले आहेत. दिवसभराची हाजरी 200 ते 500 रुपये मिळते. यामध्ये पेट्रोलचा खर्च तसेच वाहतूक खर्च कमी करण्यासाठी काही नागरिक कामगार हे एका दुचाकी वर ट्रिपल सीट बसून येतात. तसेच अनेक व्यावसायिक वाहनधारक आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी बँकेचे लोन काढून चार चाकी वाहन घेतात. यामध्ये काही वाहतूक पोलीस वर कमाई साठी या सर्वसामान्य कामगार आणि व्यावसायिकांना त्रास देतात. वाहतूक सुरळीत करण्याचे काम त्यांच्या खांद्यावर दिलेले असताना ते पावत्या फाडणे, दंड आकारणे आणि गाडी पकडल्यानंतर वर कमाई साठी सर्वसामान्य नागरिक कामगार आणि व्यावसायिक यांना त्रास देत, असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये वाहतूक पोलिसांबद्दल त्यांच्यामध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाल्याची चर्चा कामगारांमध्ये होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सदरील घटनेची चौकशी करण्याबरोबर वाहतूक शाखेचे पोलीस आणि अधिकारी यांची सुद्धा चौकशी करावी. अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.