अमनविश्व हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
औरंगाबाद/ प्रतिनिधी - गारखेडा परिसर येथील अमनविश्व हायस्कूल मध्ये आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सी़.व्ही रमण यांच्या प्रतिमेस प्रशालेचे मुख्याध्यापक बद्रीनाथ थोरात यांनी पुष्पहार अर्पण केला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आज प्रशालेत चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी, निबंध स्पर्धा , वैज्ञानिक प्रतिकृती तसेच अपूर्व विज्ञान मेळावा याचे देखील आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील सोबती या विषयावर सुंदर सुंदर चित्र रेखाटून त्यांना रंग दिले. इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी माझी शाश्वत जीवन शैली, विज्ञानातील संकल्पना या विषयावर निबंध लिहिले तसेच रांगोळ्या काढल्या.तर नववीच्या विद्यार्थ्यांनी माझा आवडता संशोधक, भविष्य विधी विज्ञान सफर या विषयांवर फोटोग्राफी केली. प्रशालेचे मुख्याध्यापक बद्रीनाथ थोरात यांनी उपक्रमशील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक प्रदीप राठोड, सुधाकर गुंजाळ, शत्रुघ्न बेस्के, विलास उमाप, रमेश जाधवर, गजानन वायाळ, बिजू मारग, प्रिया राठोड ,शुभांगी परळीकर आणि कर्मचारी गोविंद राठोड गणेश क्यादर यांचे उपक्रमास सहकार्य लाभले.