जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थाच्या चेअरमन पदी रमेश मुळे

जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थाच्या चेअरमन पदी रमेश मुळे

व्हाईस चेअरमन संतोष मरमट व सचिव सागर डोईफोडे


औरंगाबाद/प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी रमेश मुळे, व्हाईस चेअरमन पदावर संतोष मरमट , सचिव म्हणून सागर डोईफोडे, तर कोषाध्यक्षपदी कल्पना गोखले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड, राज्य सल्लागार शिवाजी सोनवणे, संघाचे उपाध्यक्ष ए आर गायकवाड, पॅनल प्रमुख बी. आर. दाणे पाटील, जिल्हाध्यक्ष गंगाधर हारदे, जिल्हाध्यक्ष प्रवीण नलावडे, सरचिटणीस पी एस पाटील, माजी  सरचिटणीस,संभाजी बनकर विभागीय अध्यक्ष,तालुका अध्यक्ष/सचिव श्री के पी जंगले मामा, सुनील ढाकरे,खंडू वीर,ए के आहेर, शरद ठवाल,आर डी चौधरी,रवी नाईक, शाईनाथ जाधव, धातबळे, एम बी तांबे, आसाराम बनसोड, प्रशांत वाघमारे, जयदीप सुरसे,यांचे सह संचालक  सुनील राकडे,गणेश धनवई,अशोक काळे, अजयकुमार ठाकरे,हरुण तडवी, नितीन निवारे, अवचित राऊतराय, जनार्दन शिंदे,रामकृष्‍ण निकम, अरुण चव्हाण, छाया जाधव ,यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.


संचालक मंडळाने विश्वास ठेवून सेवेची संधी दिल्याबद्दल पदाधिकारी यांनी संचालक मंडळाचे जाहीर आभार व्यक्त केले.
 ग्रामसेवक सवर्गाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे भरीव कार्य करणार असल्याचे  नवनिर्वाचित चेअरमन रमेश मुळे यांनी यावेळी सांगितले.
 महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन 136,  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ याचे सर्व विभागीय,जिल्हा , तालुका, पदाधिकारी यांच्यासह राज्य युनियनचे माजी राज्य अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एलजी गायकवाड, राज्याचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे ,सरचिटणीस प्रशांत जामोदे , कोषाध्यक्ष संजय निकम यांच्यासह सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा