भारतातील पहिले तीन चाकी ई-वाहनांचे प्रदर्शन औरंगाबादेत
औरंगाबाद / प्रतिनिधी : औरंगाबाद मिशन फोर ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) या अभियानाच्या अंतर्गत 25 आणि 26 मार्च रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे प्रवासी आणि लोडींग इव्ही तीन चाकी वाहनांचे दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या दोन दिवसीय प्रदर्शन सोबत ईव्ही तंत्रज्ञानावर सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
तीन चाकी वाहनांचे हे भारतातील पहिले प्रदर्शन असून, ई व्ही तीन चाकी निर्माते आणि त्यांच्या ग्राहकांना एका व्यासपीठावर आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. या प्रदर्शनात ईव्ही वाहनांचे निर्माते चार्जिंग पेशन्स उद्योजक आणि बँक विमा कंपन्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शीत करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबरोबरच औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी या अभियानाने ई व्ही दुचाकी, चारचाकी व तीन चाकी औरंगाबाद शहर मराठवाडा विभाग आणण्याचे लक्ष आहे. यासाठी सुलभ प्रवेशासह चार्जिंग स्टेशनसह विकासाची योजना ही आपल्यात आली आहे.