कामगार दिनानिमित्त मनसेकडून अभिवादन
प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर
जागतिक कामगार दिना निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाळूज महानगर पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाळूज औद्योगिक परिसरातील कामगार चौकात मनसे किसान सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाथ्रीकर यांच्या हस्ते कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर
किसान सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाथ्रीकर, मनसे पश्चिम तालुका अध्यक्ष पाराजी चितळे, वाळूज महानगर विभागाध्यक्ष सुशांत भुजंगे, शाखाप्रमुख पाशा पटेल, आनंद आसले आदींची उपस्थिती होती.