पैसे देणारा पैसे कमावणारच - आ. शिरसाठ यांचा आरोप

पैसे देणारा पैसे कमावणारच - आ. शिरसाठ यांचा आरोप
Sanjay shirsath

मुंबई / प्रतिनिधी : पोलीस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गैरव्यवहारावर विधानसभेत आज नेमके बोट ठेवण्यात आले. यावेळी सत्ताधारी आमदारांनीच सरकारवर टीका केली. पोलीस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो. हे थांबवले पाहिजे. बदल्या कशा होतात ते सर्वांना माहित आहे. सेटलमेंट करून पोस्टिंग मिळवून नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी वसूल करतात असे म्हणत कनिष्ठ दर्जाच्या पोलिसांना टार्गेट न करता पोलीस निरीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जरा लक्ष द्या असे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली. आ. शिरसाट म्हणले कि, या ठिकाणी आपण कॉन्स्टेबल बद्दल चर्चा करतो. बदल्या कशा होतात हे लोकांना माहित नाही का? एकाने गडचिरोलीत ऑपरेशनमध्ये काम केले. सरकारने त्याचा सत्कार केला.

त्याने पोस्टिंग चॉइसने मागितली त्याला दिली गेली नाही. हे नवीमुंबईचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तीन महिने ती जागा रिक्त राहिली. तडजोड झाली दुसरा माणूस तिथे येऊन बसला. हे जे प्रकार घडतात ना त्यात जो माणूस पैसे देतो तो वसूल करतो हे मी जबाबदारीने याठिकाणी सांगतो असे तालिका अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांनी गृहराज्यमंत्री शुभेराजे देसाई यांना सांगितले. त्यावर देसाई यांनी सर्व आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तर वाहतूक पोलिस कामावर जाताना रिकाम्या खिशाने जातो. पण, घरी येताना मात्र चार ते पाच हजार घेऊन येतो. लोकांना शिस्त लागण्यासाठी मोबाईलवरही दंड आकारला पाहिजे. कारण असे पैसे खिशात घातले जातात. अशी टीका शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी केली. भाजप आमदार समीर कुणावार यांनी 'माझ्या मतदारसंघात पोलीस मदत केंद्र आहे. मनाजोगा पण, ते केंद्र पोलिसांना मदत करा असे झाले आहे. काही पोलीस खासगीत सांगतात की टार्गेट दिले गेले आहे. त्यामुळे पोलिसांकडूनच पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

 आमदारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई म्हणाले, तालिका सभापती संजय शिरसाठ यांनी केलेल्या आरोपांची तात्काळ चौकशी केली जाईल. आमदार कुणावर यांनी केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेतली जाईल. लोकांकडून जो दंड आकारला जातो तो वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी. कुणी जर नियम मोडला तरच दंड आकारला जातो. हा दंड आकारल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर दंडाची पावती पाठवली जाते. मात्र, आमदार जे आरोप करताहेत त्यांनी पुरावे द्या. मी क मात्र, कोणीही येईल आणि आम काही ही आरोप करेल हे चाल इशाराही त्यांनी दिला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा