प्रा. किरण पाटील ठरत आहेत शिक्षकांची पहिली पसंत
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रतिसाद
औरंगाबाद दि.२६ (प्रतिनिधी) जुनी पेन्शन योजना, शाळा अनुदान यांसह शिक्षकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागत आहेत. शाळेला अनुदानचीही घोषणा झाली आणि त्यावर ११६० कोटी निधीची तरतूद झाली यांमुळे विनाअनुदानित शाळेत अनेक वर्षी खर्ची घातलेल्या शिक्षकांना आधार मिळाला. त्या शिक्षकांनी प्रा.किरण पाटील यांना सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे. जुनी पेन्शन चा रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सक्षम असल्याच्या निर्णयामुळे शिक्षकाना आशेचा किरण दिसत आहे.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चे आंदोलन यासाठी चळवळीत सक्रिय असलेले किरण पाटील यांना मराठवाड्यात प्रचारात आघाडी घेतली आहे व त्यांना आता पहिली पसंत मिळत आहे.
विद्यमान शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे सर्वत्र नकारात्मकतेचे परिस्थिती आहे. त्यांनी काम न केल्यामुळेच आता किरण पाटलांना प्रश्न सोडवतील या अशाने शिक्षकांचा कल भाजप ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महायुती चे उमेदवार प्रा. किरण नारायणराव पाटील यांच्याकडे दिसत आहेत.
----------------
प्रचार सभा ,शिक्षक मेळावे, शाळाभेटीत शिक्षकांचा उत्स्फूर्त पुढाकार मराठवाड्यात विविध ठिकाणी प्रचार सभा शिक्षकांचे मिळावे शाळा भेटी यामध्ये शिक्षक आपल्या प्रश्नांची गऱ्हाणे पाटील यांच्याकडे मांडत आहेत
-----------------------
एका कॉल वर उपलब्ध होणारा उमेदवार म्हणून प्रा. किरण पाटील यांची ओळख आहे त्यामुळे त्यांना निवडून दिल्यानंतर येथे प्रश्न सोडवण्यासाठी कायम संपर्कात राहतील अशी शिक्षकांची मानसिकता बनलेली आहे त्यामुळे प्रा. किरण पाटील आता शिक्षकांची पहिली पसंत बनल्याचे दिसत आहे.