वाळूज महानगरात ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वार ठार

वाळूज महानगरात ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वार ठार
वाळूज महानगरात ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वार ठार

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी 
मालाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवार १२ रोजी सकाळी ९.३० वाजता वाळूज एमआयडीसीमधील कामगार चौकातील सिग्नलवर हा अपघात झाला.
   मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात संजय जयसिंग घुनावत (वय सुमारे ५५ वर्षे, मूळ रा. वाळूजवाडी ता. गंगापूर, ह. रा. शिवाजी नगर वाळूज) यांचा जागीच मृत्यू झाला.
    ट्रक क्रमांक एमएच २६ एडी ४९९५ वाळूजहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत होता. तेव्हा एक व्यक्ती कामगार चौकातून वाळूजकडे स्कूटर क्रमांक एमएच २० एचई ०६३० वर घुणावत हा कामगार चौकाच्या सिग्नलवरून जात होता. त्याच क्षणी समोरून येणाऱ्या एका ट्रकने स्कूटरला धडक दिली आणि स्कूटर ट्रकखाली आली. या अपघातात स्कूटर स्वाराचा वेदनादायक जागेवरच मृत्यू झाला.
   या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा