भारत विकास परिषद तर्फे मतदान दातृत्व हा विशेष कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - भारत विकास परिषद तर्फे कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन हेडगेवार रुग्णालयात करण्यात आले होते. यामध्ये 40 जणानीं रक्तदान केले. यामध्ये "मतदान जागृती दातृत्व" हा विशेष कार्यक्रम घेण्याचे ठरले. यामध्ये जे मतदाते मतदान केंद्रावर वाहना अभावी जाऊ शकत नाही अशा नागरिंकासाठी भारत विकास परिषदेच्या वतिने वाहन पुरवल्या जाईल व अशा नागरिकांना पुन्हा घरी आणून सोडता येईल.
यावेळी दिं 4 मे रोजी नवीन कार्यभार स्वीकारलेल्या सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. डाॅ एन .डी. कुलकर्णी यांनी पालकत्व या नात्याने नवीन सदस्यांना शपथ दिली. यामध्ये पूर्व शाखा अध्यक्ष भारती भांडेकर बिस्वास, सचिव उमा कुलकर्णी तर कोषाध्यक्ष म्हणून श्रीकांत तलेले यांनी शपथ घेतली. वर्षभरातील कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये "मतदान जागृती दातृत्व" हा विशेष कार्यक्रम घेण्याचे ठरले. यामध्ये जे मतदाते मतदान केंद्रावर वाहना अभावी जाऊ शकत नाही अशा नागरिंकासाठी भारत विकास परिषदेच्या वतिने वाहन पुरवल्या जाईल व अशा नागरिकांना पुन्हा घरी आणून सोडवता येईल. यासाठी परिषदेमार्फत डाॅ. एन. डी.
कुलकर्णी, भारती भांडेकर बिस्वास व गोपाल होलानी यांना संपर्क करावा असे परिषदेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. मोबाईल नंबर.
डाॅ. एन.डी. कुलकर्णी 9822435520,
गोपाल होलानी. 9325210297.
भारती भांडेकर बिस्वास 9890285580.