रस्ते चांगले असेल तर शहराचा विकास निश्चित - एकनाथ शिंदे
औरंगाबाद / प्रतिनिधी
पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी माझ्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, शहराचे रस्ते चांगले असेल तर शहराचा विकास निश्चित होत असतो, त्यामुळे औरंगाबादला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे़ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून औरंगाबादकडे बघितले जाते, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले़
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आ संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदार संघात बालाजीनगर येथील सिंधी कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंग मंदीर पासून ते शाह कॉलनी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, मिटमिटा अंतर्गत भारत टॉवर पासुन ते कोमलनगर पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे व पूर्व मतदार संघातील विजयनगर चौक पासुन ते रुचके मंगल केंद्रापर्यंत रस्ता व्हाईट टॉपिंग करणे या कामाचे भूमिपूजन आज मंगळवारी २३ नोव्हेबर रोजी पार पडला.
यावेळी रोजगारहमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख तथा आ अंबादास दानवे, आ प्रदीप जैस्वाल, आ उदयसिंग राजपूत, आ रमेश बोरणारे, माजी आ किशनचंद तनवाणी, मा महापौर नंदकुमार घोडेले, मा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, शहरप्रमुख विजय वाघचौरे, शिल्पाराणी वाडकर, सुमित्रा हाळनोर, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप, सुनीता आउलवार, कला ओझा आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी नगरविकास मंत्री म्हणाले की,आ संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी माझ्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, ज्या शहराचे रस्ते चांगले असेल तर शहराचा विकास हा निश्चित होत असतो, आ शिरसाट यांनी त्यांच्या मतदारसंघातील सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी घेतले आहे़, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिकेला उपलब्ध करून देत बºयाच प्रमाणामध्ये शहरामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा या योजनेचे देखील कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे, हे रस्ते करताना याच काम त्वरित सुरू झालं पाहिजे चांगल्या दर्जेदार रस्ता नागरिकांना उपलब्ध करून देण्याच काम हे आपलं आहे, तसेच पडेगाव या भागात असलेल्या मिरानगर, सुंदरनगर परिसरातील रस्त्याकरिता नव्याने प्रस्ताव द्या त्याला निधी उपलब्ध करून देतो असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना दिलेला शब्द पाळते, प्रत्येक भागाचा विकास करणे हा शिवसेनेची वचनपूर्ती आहे, हे काम करत असताना लोक नक्किच शिवसेना पक्षाच्या बाजूने उभे राहतील असे शिंदे यांनी सांगितले
यावेळी आ शिरसाट म्हणाले की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला पश्चिम मतदार संघात असलेल्या सातारा-देवळाई व इतर भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, आज त्यांनी दिलेल्या निधीमुळे या भागाचा कायापालट मी करू शकलो, तसेच पडेगाव या भागातील मिरानगर, सुंदरनगर या परिसरातमधील सगळ्यात मोठा रस्ता असलेल्या भागासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मीरानगर व सुंदरनगर याला जोडणाºया मुख्य रस्ता खºया अथाने आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन होऊन कामाला देखील उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक व महिला आणि व्यापारी वगार्चा प्रश्न सुटणार आहे, तसेच विरोधकांवर टीका करत विजयनगर या भागात असलेल्या रस्त्याचे भूमीपूजन याआधी बºयाच नेत्यालोकांनी ३ वेळा केले आहे पण मात्र सुरू केले नाही, जेव्हा शिवसेना शब्द देतो तेव्हा त्या कामाचे भूमीपूजन होऊन काम देखील सुरू करत असते हा विजयनगर मधील रस्ता माझ्या मतदार संघात येत नसला तरी या भागात राहणार नागरिक हा माझा आहे यांच्याशी माझी बांधिलकी आहे, त्यामुळे नागरिकांना होणाºया त्रासामध्ये शिवसेना कशी राहू देईल असे टीका देखील आ शिरसाट यांनी विरोधकावर केली, क्रांती चौक उस्मानपुरा या परिसरातील संत एकनाथ रंग मंदीर पासून ते शाह कॉलनी पर्यंत रस्ता काही अडचणीमुळे रखडला होता, त्यामुळे हा रस्ता होऊ शकला नाही, परंतु नगरविकास खात्यामधून भेटलेल्या निधीमुळे या रस्त्याचे भूमिपूजन झालं असून या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे या भागात या आधी पावसाचे पाणी वाहून लोकांच्या घरामध्ये शिरत होते, शाळेकरी मुलांना देखील या वाहत असलेल्या पाण्यातुन वाट काढावी लागत होती आता हा रस्ता झाला की त्रास होणार नाही तसेच या भागामध्ये यापूर्वी सभागृह, रस्ते, ड्रेनेज लाईनचे काम देखील केले आहे, एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार देखील आ शिरसाट यांनी मानले.
यावेळी उपशहरप्रमुख अंबादास म्हस्के, रमेश बाहुले, राजू राजपूत, शाखाप्रमुख नितीन पवार, राहुल एलदी, हिरालाल वाणी, संतोष आम्ले, किसन कनिसे, सुभाष शेजवळ, संतोष बोर्डे, युवासेनेचे शेखर जाधव, नंदू म्हस्के, पराग कुंडलवाल, संदीप लिंगायत, ज्योतिराम पाटील, अमोल पाटे, यश पागोटे, महेश पाठक, सूरज शिंदे, आकाश हिवाळे. गणेश टेलरे, शेखर पेटकर व मोठ्या सख्येने शिवसेना-युवासेना-महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थिती होती.