शिवसेनेच्या वतीने बदलापूर घटनेचा दंडाला काळ्याफिती बांधून मूक निदर्शने
वाळुज महानगर - बदलापूर येथील शाळेत दोन बालिकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बजाजनगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात शनिवार 24 रोजी सकाळी 11 वाजता हाताच्या दंडाला काळेफिती व तोंडाला काळे रुमाल बांधून महायुती सरकार च्या विरोधात मुक निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते.मात्र न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला होता.त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेतला.परंतु या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर शिवसेनेच्या वतीने दंडाला काळ्याफिती व तोंडाला काळे रुमाल बांधून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत राज्य शासनाचा निषेध केला. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात शनिवारी अकरा वाजता शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी हातात बदलापूर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या,गुन्हेगारांना पाठीशी घालणारा सरकारचा जाहीर निषेध, महिलांना पंधराशे रुपये नको, सुरक्षा द्या, अशा आशयाचे फलक घेत शासनाचा अधिकार केला. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक सचिन गरड,उपतालुकाप्रमुख कैलास भोकरे, विष्णू जाधव,गणेश नवले,सुदाम भांडे, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, विशाल खंडागळे,काँग्रेसचे वाळूजमहानगराध्यक्ष अर्जुन आदमाने, पोपटराव अदीक,नंदकुमार साळुंके, कृषी उत्पन्न समितीचे संचालक महेंद्र खोतकर,माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, उपशहर प्रमुख सय्यद बिबन,किशोर खांडरे, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे,संभाजी चौधरी, काकाजी जीवरग,विभाग प्रमुख नामदेव सगडे,संतोष चंदन,सतीश हिवाळे,रोहित चव्हाण,लखन सलामपुरे,भागचंद खरात,आसाराम करपे,नवनाथ मनाळ,शिवाजी ढेपे, राजेश पाटील,अण्णा कांडेकर रतन नलावडे अनिकेत थोरात तुषार ढवळे, सागर उगले,अक्षय साळुंखे,प्रशांत पथरीकर,आशिष ताजने,योगेश दुबीले,घनशाम पाटील,गोकुळ राठोड, प्रदीप मलोदे,गौरव खनासे,शैलेश पाटील,सागर पाटील,प्रवीण चव्हाण, यश चव्हाण,रोहित भालेकर,अनुदीप डबडे,आकाश हिवाळे,प्रणव तवले, सतीश शिंदे,गणेश औटे,विशाल सौदागर,अमित देशमुख,स्वप्निल राठोड,आशिष पवार,किरण बुचाले, प्रसाद काळे,सोमनाथ गायकवाड,बंटी बोरसे,केतन बगाडे,विजय टाक, विशाल राठोड,मयूर शेळके,शुभम पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज शिंदे, सुरेश कच्चे,एएसआय बन,बबन चोथे, विक्रम वाघ,हवालदार नितनवरे आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.