अखंड उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करणार केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आश्वासन
औरंगाबाद / प्रतिनिधी : खासदार इम्तियाज अली यांनी चार एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे भेट देऊन जालना रोडवरील अखंड उड्डाणपूल पैठण रस्ता आणि शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत चर्चा केली. गडकरींनी जालना रोडवरील उड्डाणपुलाच्या डीपीआर च्या कामाला गती देऊन तात्काळ आखंड उड्डाणपुलाचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.
खासदारांनी एनएचएआय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या होत्या अखंड उड्डाणपूल व्हावे म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याची तयारी दर्शवली होती.
4 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सोबत झालेल्या चर्चेदरम्यान शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करून पैठण रस्त्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील प्रलंबित व प्रस्ताविक इतर प्रकल्पाविषयी चर्चा केली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निकृष्ट रस्त्याची चौकशी करावी, अनेक वर्षापासून रखडलेली रस्त्यांची कामे करावी अशी मागणी केली.