अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आज क्रिकेटमधून निवृत्ती घेणार
इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने Ben Stokes आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. आज मंगळवार (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पत्र लिहून त्याने याबाबत घोषणा केली.
बेन स्टोक्स म्हणाला, “मी मंगळवारी डरहॅम येथे इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे अत्यंत कठीण आहे. मला माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडसाठी खेळतानाचा प्रत्येक मिनिट आवडतो. आम्ही आतापर्यंत अविश्वसनीय प्रवास केला आहे. हा निर्णय घेणे कठीण होते. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी माझ्या संघसहकाऱ्यांना १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. इंग्लंडची जर्सी घालणाऱ्या कोणत्याही खेळाडूकडून ही वाईट कामगिरीची अपेक्षा नसते.”
” क्रिकेटच्या तीन प्रकारांमध्ये मी आता टिकाव धरू शकत नाहीत. व्यस्त वेळापत्रक आणि आमच्याकडून असलेल्या अपेक्षांपुढे माझे शरीर मला साथ देत नाही. माझ्या जोस आणि इतर सहकाऱ्यांना नक्कीच एखादा चांगले योगदान देणारा खेळाडू मिळले. क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याची आणि गेल्या ११ वर्षांत माझ्यासारख्या अनेक अविश्वसनीय आठवणी तयार करण्याची संधी दुसऱ्या कुणाला तरी देण्याची हीच योग्य वेळ आहे”, असेही स्टोक्स म्हणाला
11 years and countless ODI memories ❤️
Thank you, @benstokes38