चालकाचा ताबा सुटला आणि कार कठडा तोडून कोसळली

चालकाचा ताबा सुटला आणि कार कठडा तोडून कोसळली

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी शिवारात स्वयंभू कंट्रक्शन कंपनी जवळ चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार चालकाचे संतुलन सुटल्याने कार पुलाला घडकून कठडा तोडून कोसळली.
यात मयुर बुर्‍हान रा. मनिषनगर नागपूर यांचा जागीच मृत्यु झाला तर ऋतिका बुर्‍हान गंभीर जखमी झाली. ही घटना आज 19 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणार्‍याह एम. एच. 34 ए एम 9925 क्रमांकाच्या कार चालकाचे वाहनावरील संतुलन सुटल्याने भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडक देत खाली कोसळली. यात मयुर बुर्‍हान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऋतिका बुर्‍हान गंभीर जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा