बिडकिन येथे अतिक्रमण हटाव मोहिम सुरू
औरंगाबाद : पैठण रोडवरील बिडकीन येथे बस स्थानक परिसरातील व रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. यासाठी ग्रामीण पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष माने आपल्या सहकाऱ्यांसह बस स्थानक परिसरात बंदोबस्तासाठी उपस्थित होते.