वाळूज माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर मिरवणूक संपन्न
वाळूज /प्रतिनिधी : येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे गणगौर मिरवणूक चैत्रशुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी शनिवारी मोठ्या थाटामाटात गणपती मंदिर ते महादेव मंदिरमार्गे काढण्यात आली. उमा भन्साळी यांच्या निवास्थानी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
गणगौर निमित्त महिलांनी सोळा शृंगार करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यावेळी घूमर राजस्थानी नृत्य करून आनंद उत्सवात हा सण साजरा करण्यात आला. सर्वांनी राजस्थानी वेशभूषा करून या मिरवणूकीत सहभाग नोंदवला होता.
यावेळी किरण राठी, रचना मालपाणी, शीतल मोदानी, विद्या सारडा, उमा भंसाली, विजया काबरा यांचे सहकार्य लाभले.