औद्योगिक गुंतवणूकीसाठी आठ देशांचे राजदूत शहरात दाखल
औरंगाबाद / प्रतिनिधी : औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटन राजधानी औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 'ऑरा ऑफ ऑरिक' एक या विदेशी गुंतवणूक आणि पर्यटन संधी बाबत 26 मार्च रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंगापूर, उपराजदूत सिंगापूर, स्वीडन, जर्मनी, कोरिया, इस्त्राईल, नेदरलँड, रशिया, उप राजदूत रशिया, इत्यादी देशांचे राजदूत शुक्रवारी शहरात आले आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याला जागतिक पातळीवर प्रमोट करणे तसेच औरंगाबाद परिसरातील पर्यटन संधीचा आढावा या परिषदेतून घेणे अपेक्षित आहे.
शनिवारी सकाळी शेंद्रा ओरिक मध्ये ही परिषद होईल. उद्योग मंत्री सुभाष देसाई पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.