जि.प.च्या अतिरिक्त सीईओ उज्ज्वला कोळसे यांनी पदभार स्विकारला

जि.प.च्या अतिरिक्त सीईओ उज्ज्वला कोळसे यांनी पदभार स्विकारला

जि.प.च्या अतिरिक्त सीईओ उज्ज्वला कोळसे यांनी पदभार स्विकारल

औरंगाबाद / प्रतिनिधी : मागील पाच-सहा महिन्यापासून रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी उज्ज्वला कोळसे-बावके यांची नियुक्ती मार्च मध्ये झाली आहे. त्या नाशिक येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. नियुक्ती झाल्यानंतरही मागील अनेक दिवसापासून कोळसे यांची रुजू होण्याची वाट पाहण्यात येत होती. मात्र त्यानी सोमवार (०४) रोजी पदभार स्वीकारला आहे.

अतिरिक्त सीईओ संतोष कवडे यांनी १२ फेब्रुवारी २०२० ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत यांनी कामकाज पाहिले. २ नोव्हेंबरला त्यांची मुंबईला बदली झाल्याने, या रिक्तपदाचा अतिरिक्त पदभार पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. २२ नोव्हेंबरला त्यांनीही हा अतिरिक्त पदभार सोडला, तेव्हापासून मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे हेच अतिरिक्त सीईओ म्हणून कामकाज पाहत आले आहेत. कोळसे यांची नियुक्ती झाल्याने आता सोमवार दि. ४ एप्रिल रोजी रोजी त्यांनी पदभार स्विकारला. यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असलेला अतिरिक्त भार कमी होऊन कामाला गती मिळणार आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा