जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल अजिंक्य
औरंगाबाद/ प्रतिनिधी - बळीराम पाटील स्कूल च्या क्रीडा मैदानात 2 आणि 3 जानेवारी दरम्यान झालेल्या जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल ने युनिव्हर्सल स्कूल चा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
अतिशय रंगतदार आणि चूरसीच्या झालेल्या अंतिम सामन्यात गुरुकुल ने पहिला सेट जिंकून बढत घेतली, पण 2 रा सेट युनिव्हर्सल स्कूल ने जिंकून सामन्यात वापसी केली, परंतु 3 ऱ्या सेट मध्ये अनिकेत देवकाते व वरद वैरागढ यांची उत्कृष्ट सर्व्हिस आणि इतर खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक खेळाच्या बळावर गुरुकुल ओलंम्पियाड ने अंतिम सामना 2-1अशा सेट ने जिंकला.
आता गुरुकुल ओलंम्पियाड चा विजेता संघ विभागीय स्पर्धेत औरंगाबाद मनपा चे प्रतिनिधित्व करेल.
खेळाडूंच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य डॉ सतिश तांबट, मेंटोर गणेश साळुंखे, मॅडम,एच एम कविता मॅडम, कोऑर्डिनेटर रेशू मॅडम, रक्षदा मॅडम सह सर्व शिक्षक वर्गाने अभिनंदन केले.
क्रीडा विभाग प्रमुख अविनाश सर,व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिषेक सर यांच्या मार्गदर्शना खाली संघाने यश संपादन केले.
विजेता संघामध्ये देवाशिष राऊत, उमर सय्यद,अद्वाईत क्षीरसागर, वरद वैरागर, आयुष्य कस्तुरे, श्रीकर कोमूळवार, तनिश्क संकलचा,संस्कार परदेशीं, तन्मय भारंबे, मनोविजय गायकवाड, अथर्व मुंडे यांचा समावेश आहे.