ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची आवश्यकता - मंत्री अतुल सावे

संभाजीनगर/ प्रतिनिधी - वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इतर मागास वर्ग कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवास इतर मागसवर्ग कल्याण मंत्री सावे यांनी आज भेट दिली. ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. तसेच ग्रंथोत्सव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जयदेव डोळे, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. ह. नि. सोनकांबळे, ॲड बाबा सरदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचनाचे आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी महत्त्व आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व विकसीत होते,असेही मंत्री सावे यावेळी म्हणाले.