महिलांसाठी अर्थसाह्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना

महिलांसाठी अर्थसाह्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना

संभाजीनगर / प्रतिनिधी :  गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना अर्थसाह्य  देणारी पिंक ई-रिक्षा योजना राज्य सरकारच्या  महिला व बालविकास विभागाद्वारे  सुरू करण्यात आली असून संभाजीनगरमध्ये ६०० महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे.
    या योजनेत रिक्षासाठी ७० टक्के कर्ज देण्यात येईल. २० टक्के रक्कम शासन देणार आहे आणि १० टक्के रक्कम ही अर्जदाराला प्रारंभी द्यावी लागणार आहे. मुख्यत्वे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्राधान्य दिले जाईल. योजनेसाठी ३ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला पात्र असतील.आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा आदी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत.
या योजनेसाठी २० ते ४० वयोगटातील महिलांनाच अर्ज करण्याची संधी दिली जाईल. यामुळे युवती व मध्यमवयीन महिलांना नवी सुरुवात करण्याचा चांगला पर्याय मिळेल.
पिंक ई-रिक्षा योजनेसाठी २० ते ४० वर्षांच्या महिलांनी अर्ज करावा. योजनेत लाभार्थी महिलांनाच ही रिक्षा चालविणे बंधनकारक असेल. अशी माहिती आर. एन. चिमंद्रे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा