सावधान! सावधान! सावधान.... संभाजीनगरमध्ये जीबीएस चा प्रवेश
संभाजीनगर वासियांना आता सावधान होण्याची गरज आहे. पुण्यानंतर आता संभाजीनगरमध्ये ही जीबीएस चे तीन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील जीबीएस च्या रुग्णांचा आकडा 111 वर गेला असताना महाराष्ट्रातील विविध भागात देखील जीबीएस चे रुग्ण आढळून येत आहेत.
जीबीएसचा वाढता प्रसार पाहता महाराष्ट्राची धाकधूक वाढताना दिसत आहे. पुण्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीत जीबीएस सदृश्य रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या व्हायरसने शिरकाव केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन जणांना जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दोन महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांवर संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 21 जानेवारी रोजी मेडीसीन घाटीत भुसावळ येथील 35 वर्षीय महिला दाखल झाली होती. तर 27 जानेवारी रोजी वसमत (हिंगोली) येथील 35 वर्षीय महिला दाखल झाली. या दोन्ही रुग्णांमध्ये पॅरालिसिससारखी लक्षणे आढळली आहेत. तर एका दहा वर्षांच्या मुलीमध्ये देखील जीबीएसची लक्षण आढळली आहे.
पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. सोलापूरमध्ये एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आजार दिवसेंदिवस गंभीर वळण घेत असला तरी काही घाबरण्याचे कारण नाही, असेही आरोग्य विभागाकडून सांगितलं जातंय. मात्र हा आजार संसर्गजन्य आहे का? नेमका हा कोणाला होऊ शकतो? याविषयीची माहिती पुण्यातील डॉ. सचिन पवार यांनी दिली आहे.
कोणाला होऊ शकतो आजार?
जीबीएस हा आजार एक ऑटो इम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये इम्युनिटी सिस्टीम कमजोर होते आणि पेरिफेरल सिस्टमवर अटॅक होऊन रुग्णांना हातापायाला मुंग्या, अशक्तपणा, पॅरालीसीस अशा प्रकारची लक्षणे ही रुग्णांमध्ये पाहिला मिळतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणालाही होऊ शकतो. काही संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यामध्ये फ्लू किंवा covid 19 प्रकारची इन्फेक्शन पाहिला मिळत.
ज्या रुग्णांनी कुठलीही लस घेतली असेल तर जीबीएसचा धोका हा उद्भवू शकतो. परंतु हे क्वचित रुग्णांमध्ये पाहिला मिळत. त्याचप्रमाणे कुठलीही मोठी सर्जरी किंवा दुखापत झाली असेल तर इथेही जीबीएसचा धोका हा पाहिला मिळतो. तसेच वयोवृद्ध नागरिक आणि ज्यांची इम्युनिटी ताकद कमी झाली असेल त्यांना देखील हा धोका उद्भवू शकतो, असं डॉ. सचिन पवार सांगतात.