शहरात पुन्हा एक ला़. प्र .वि.च्या जाळ्यात
संभाजीनगर / प्रतिनिधी - संभाजीनगर शहरात मागील वर्षी अनेक अधिकारी लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. तरीदेखील लाच मागणाऱ्यांवर काहीही परिणाम किंवा वचक दिसून येत नाही. परंतू लाच प्रतिबंधक विभाग मात्र सतर्कपणे कार्य करत असल्याचे दिसून आले म्हणूनच या वर्षी च्य सुरूवातीलाच ग्रामीण भागातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदारास लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.
ग्रामीण वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार धीरज धर्मराव जाधव (वय ५०,रा़.एन.११, डी.३१/२, रवीनगर हडको,छत्रपती संभाजीनगर) यांनी संभाजीनगर ग्रामीण हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी तक्रारदारास हप्ता म्हणून महिन्याला २०,००० रू.द्यावे लागतील असे सांगितले़ लाच प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून हवालदार धीरज जाधव यांना वाळूज एमआयडीसी रोड, गाडेगाव फाटा,जस्ट पॅक इंडस्ट्रीयल कंपनीसमोर, रांजणगाव शिवार, ता़.पैठण येथे लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले़.
ही कारवाई लाच प्रतिबंधक विभागाचे पोनि. विजय वगरे, पोअ संदिप आटोळे, अप्पर पोलिस अधिक्षक मुकूंद अघाव, पो़उप अधिकक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केली़. या कारवाई सोबतच लाच प्रतिबंधक विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त जास्त रकमेची मागणी करत असेल तर त्वरीत ल. प्र.विभागाशी संपर्क साधावा़ संपर्क क्रं 9923023361,9923247986 तसेच टोल फ्री क्र. 1064.