छत्रपती संभाजीनगर ला रंगणार भारत पर्व
संभाजीनगर / प्रतिनिधी - सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारत पर्व या मराठी हिंदी देशभक्तीपर गीत व नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपति संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून, विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये राहुल जेठे, भाग्यश्री अभ्यंकर आणि समुह,असे नामवंत गायक गायिका सहभागी होणार असून दिपाली कुलकर्णी यांच्या निवेदनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर नृत्याविष्कार आरती क्रिएशन उमेश चाबुकस्वार आणि समूह तसेच भरतनाट्यम "देवमुद्रा" व्ही सौम्याश्री पवार आणि समुह यांचा आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.