पर्यावरण पूरक इलेक्ट्रॉनिक वाहनांचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
औरंगाबाद / प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करण्याचा घेतलेल्या निर्णय घेतला असून औरंगाबाद महानगरपालिकेने अधिकारी वर्गासाठी ई वाहने घेतली आहेत. शनिवारी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथाऔरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या वाहनांचे उद्धघटन करून लोकार्पण करण्यात आले.
यामध्ये पाच नवीन इलेक्ट्रॉनिक कार व शहरातील नाले सफाई, मलबा उचलणे खाम नदी या कामासाठी तीन हायवा खरेदी केल्या आहेत. या वाहनमध्ये इलेक्ट्रिक कार आणि हायवा या गाड्याचा सामावेश होता.
या लोकार्पण सोहळ्य प्रसंगी आमदार अंबादास दानवे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता एसटी पानझडे, कार्यकारी अभियंता भागवत फड, तनपुरे पंडीत आदी उपस्थित होते.