बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सिल्लोड / प्रतिनिधी : सिल्लोड तालूक्यातील पिंपळदरी येथे मध्य रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना मंगवारी उघडकीस आली. या घटनेने पशुपालकांमध्ये दहशतीने भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पिपळदरी शेत शिवारातील गट. क्र. ५१ मध्ये लक्ष्मण रामराव कळंत्रे यांनी नेहमीप्रमाणे सांयकाळी गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या.
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढविला.या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. याघटनेची माहिती अजिंठा वनविभागाला देण्यात आली.
बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच :
बिबट्याचा वावर सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी शिवारात नित्याचा झाला असून, वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या पशुधनावर बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. पिंपळदरी येथे सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची पशुपालकांकडून मागणी होत आहे.