देशातील पहिल्या एसटीपी प्लांटच्या पथदर्शी योजनेचा पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
औरंगाबाद / प्रतिनिधी : भारतातील पहिल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या झाल्टा येथील सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) मधुन प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करणाऱ्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ व लोकार्पण महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म मराठी भाषा विभाग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.
या पथदर्शी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेती सुजलाम-सुफलाम होणार आहे. या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कुमार पाण्डेय व पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनापासून अभिनंदन केले.
औरंगाबाद महानगरपालिका, 2030 water resources group (WRG), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, युवा मित्र, सुखना जलक्रांती पाणी वापर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झाल्टा,सुंदर वाडी येथील एसटीपी या पथदर्शी योजनेचा शुभारंभ आज शनिवारी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष यांच्या हस्ते झाला. या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार अंबादास दानवे, उमेष वाघ, झाल्टा ग्रामपंचायत सरपंच सौ वर्षा शिंदे,शहर अभियंता एस.डी .पानझडे, अभियंता भागवत फड, तनपुरे, पंडीत आदीं उपस्थित होते.