राजमाता जिजाऊ रथयात्रेचे बजाजनगर मध्ये जल्लोषात स्वागत
संभाजीनगर/प्रतिनिधी - माता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी वैजापूर येथून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ मातेचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ रथयात्रा जाते. या रथ यात्रेचे बजाजनगर मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ही रथयात्रा प्रथम तिसगाव चौफुली वरून वडगाव,छत्रपती नगर,मोहटादेवी चौक, जागृत हनुमान मंदिर मार्गे जिजाऊ जगतगुरू तुकोबाराय मंदिर येथे आली. या परिसरात रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे महाराज, विठ्ठल माकने ,शिवाजी थोटे, विजय पाटील,गोविंद जाधव, लिंबराज सोमवंशी,प्रसाद गागरे, दिनेश राऊत,वैशाली गागरे,चव्हाण ताई या मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ रथाचे पूजन करून जिजाऊ मातेच्या प्रतिमेला ला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिजाऊ रथयात्रा आयोजक मराठा सेवा संघाचे मोतीभाऊ वाघ यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मराठा सेवा संघाचे उपजिल्हाअध्यक्ष मोतिभाऊ वाघ यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले, की येत्या संक्रातीला वाण म्हणून पुस्तके भेट द्या. पुस्तक वाचले की मन,मेंदु,मस्तक तेजोमय होऊन त्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात नक्कीच होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश राऊत यांनी केले. रथयात्रेत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ वाघ,संदीप मस्के, अमोल लेकुरवाळे, विशाल गायके, गौरव धुरट, गणेश वाघ, लक्ष्मीबाई जेजुरकर, उज्वला निकम,तनुजा धुराट, दिपाली खैरनार, हर्षदा शिरसाट यांच्यासह बजाजनगर मधील मराठा सेवा संघ,संभाजी बिग्रेड, जिजाऊ बिग्रेड, व्यापारी मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले