राजकीय स्थैर्य नसेल तर सामाजिक स्थिरता बिघडते -ॲड विष्णू ढोबळे

संभाजीनगर / प्रतिनिधी - आणिबाणीनंतर राजकीय स्थिरता संपुष्टात आली. आणिबाणीपर्यंत सामाजिक स्थिरता टिकून होती. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ सुरु झाली. शरद पवारांनी योग्य भूमिका घेऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला. मात्र या चळवळी दरम्यान जे सामाजिक प्रश्न शिल्लक राहिलेत त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे," असे मत नामांतर चळवळीतील कार्यकर्ते ॲड. विष्णू ढोबळे यांनी मांडले. विवेकानंद महाविद्यालयात ॲड.विष्णू ढोबळे यांचे नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर दादाराव शेंगुळे हे होते. दोन्ही उपप्राचार्य डॉ. आर आर शिंदे, डॉ.अरुणा पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नामविस्तार चळवळीचा संपूर्ण पट प्रास्ताविकात प्राचार्य दादाराव शेंगुळे यांनी मांडला. आभार डॉ. रवींद्र शिंदे यांनी मानले. डॉ. शर्मिष्ठा ठाकुर यांनी सूत्रसंचालन केले.