अखेर प्रतीक्षा संपली घाटीच्या अधिष्ठाता पदी डॉ. संजीव ठाकूर

अखेर प्रतीक्षा संपली घाटीच्या अधिष्ठाता पदी डॉ. संजीव ठाकूर

औरंगाबाद / प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता पदी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती शुक्रवारी करण्यात आली. डॉक्टर ठाकूर सोलापूर येथील डॉक्टर वैंशपायान स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून प्रशासकीय बदलीने ही पदस्थापना करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

डॉ. कानन येळीकर निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. आता डॉ. संजीव ठाकूर यांच्या रूपाने पुर्णवेळ घाटीसाठी अधिष्ठाता म्हणून लाभले आहेत

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा