कोल्हर कंपनीत चोरी करणारे गजाआड करमाड पोलिसांची उत्तम कामगिरी

करमाड/ प्रतिनिधी - शेंद्रा एमआयडीसीतील कोल्हर कंपनीतील सात लाख रुपयाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार काही दिवसापूर्वी दाखल करण्यात आली होती. करमाड पोलिसांनी उत्तम कामगिरी करत चोरट्यांना गजाआड केले.
शेंद्रा एमआयडीसीतील देवगिरी सोसायटीत रहिवासी असलेले व्यवसायिक सुशांत कुचेकर यांनी करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, दि.11 ऑगस्ट 7 वा. ते 12 ऑगस्ट 2024 रोजी 9 वाजे दरम्यान कोल्हर कंपनीतील लोखंडी नट बोल्ट स्टिल स्ट्रक्चर (PEB) असे ७,९९,०४८ रुपयाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या गुन्हयाचा तपास पोह शिवाजी मदेवाड यांच्याकडे देण्यात आला होता.
तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, या चोरीमध्ये अविनाश कल्याण निकाळजे, सुरज चंद्रकात साळवे (दोघे रा.शेवगा ता. जि. छत्रपती संभाजीनगर) ,करण पुंडलिक कांबळे( रा निल्लोड ता सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. अलोकनगर सातारा परिसर ),मंगेश राजू पगारे( रा. मारसावळी ता. फुलंबी जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा हात आहे. त्यांनी या आरोपींना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपीकडून गुन्हयात वापरलेल्या चार मोटार सायकली, तीन मोबाईल व गेल्या मालाची विक्री करुन मिळालेल्या पैशापैकी नगदी ६०,०००/- रुपये असा एकूण ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्हयात आरोपी सोबत अजून त्यांचे चार साथीदार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड , अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिह, उपविभागीय पोलीस अधिकारी पुता नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोह शिवाजी मदेवाड, पोह विजयसिंग जारवाल, पोअं विनोद खिल्लारे, पोअं संतोष टिमकीकर यांनी केली आहे.