'त्या व्हायरल' व्हिडिओतील महिला कीर्तनकाराने विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

'त्या व्हायरल' व्हिडिओतील महिला कीर्तनकाराने विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद / प्रतिनिधी : सध्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात महिला व पुरुष कीर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि त्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, याच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या कीर्तनकार महाराजांची जिल्ह्यात प्रतिष्ठीत कीर्तनकार म्हणून ओळख आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. चित्रफितीमध्ये दिसत असलेल्या महाराजांना एक मुलगा देखील आहे. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी चित्रित केल्याचंही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

सदरील व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी महिला हीदेखील महाराज आहे ती ज्या परिसरात राहते त्या परिसरात अनेक लोक तिला मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे यु ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे. 

सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा