राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५ चे आयोजन
संभाजीनगर/ प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि.२७ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती "संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्यात उत्तमोत्तम कलावंत दडलेले आहेत.या कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा,नवनिर्मिती करणारा,नावीन्यपूर्ण असा उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.या मुळे सांस्कृतिक क्षेत्राच्या कक्षा रुंदावून नवे पर्व सुरू होण्यास मदत होणार आहे.या करिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आपले हक्काचे रंगमंच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा.
सदर स्पर्धा दि.२७ ते ३० जानेवारी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उप आयुक्त तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहेत.
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
१.एकांकिका सांघिक प्रथम पुरस्कार - रू.३१०००/-
२.द्वितीय पुरस्कार - २१०००/-
३. तृतीय पुरस्कार - ११०००/-
तसेच दोन उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी रू.५०००/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह .
या सोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा या करिता प्रत्येकी प्रथम - रू.३०००/- ,द्वितीय - रू.२०००/- व तृतीय - रू.१०००/-
प्रदान करण्यात येणार आहेत.
दि.२२ जानेवारी २०२५ पर्यंत अंतिम प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे.प्रत्येकी नोंदणी शुल्क रू.५००/- असून स्पर्धकांनी स्वतः सर्व नाट्य साहित्य सोबत आणावे लागणार आहे.
तरी जास्तीत जास्त कलाकारांनी छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले आहे.
प्रवेशिका व अधिक माहिती करिता स्पर्धकांनी ८३२९२७६२६४,
८२०८८९९८३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे