बिडकीन येथे गुटखा गोडावुनवर पोलीसांची धाड ३७ लाखाचा गुटखा जप्त

बिडकीन येथे  गुटखा  गोडावुनवर पोलीसांची धाड ३७ लाखाचा गुटखा जप्त

औरंगाबाद/प्रतिनीधी  - पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहीती आधारे  स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी प्रतिबंधित आलेल्या तीन गुटखा गोदाऊनवर धाड टाकली असता ३७ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांना मिळून आला या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
      बिडकीन परिसरात गोडाऊन मध्ये गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे विजय जाधव, सपोनि संतोष माने यांच्या पोलीस पथकांने बिडकीन येथे विविध ठिकाणावर धाड टाकुन तापसनि केली असता प्रतिबंधीत गुटखा साठवणुक करणारे युसुफ पठाण, परवेश पठाण, असलम पठाण यांना सदरील प्रतिबंधित गुटखा तंबाखू वगैरे वगैरे बद्दल विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना समाधानकारक उत्तर दिले नाही मात्र या पुर्वी सुध्दा संबधीत लोकावर बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी साठवून ठेवलेला गुटखा अंदाजे किंमत ३७ लाख रुपयाचा मिळून आल्याची माहिती पोलीस अधीकारी संतोष माने यांनी दिली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात युसुफ पठाण, परवेश पठाण, असलम पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ.निमीत गोयल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, उपाधीक्षक  डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखालीपर पोउपनी गीरासे हे करीत आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा