वाळूजच्या लाचखोर पोलीसाला रंगेहाथ पकडले!
औरंगाबाद: आरोपीचे एका गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पाच हजाराची लाच स्विकारणा-या पोलीस हेडाकांस्टेबलला लाचलूचपत प्रतिबंधक विभागने रंगेहाथ पकडले. अण्णासाहेब लक्ष्मण शिरसाठ वय (54) पोलीस हेडकांस्टेबल असे आरोपीचे नाव आहे. शिरसाठ पोलीस एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन औरंगाबाद शहर येथे कार्यरत होता.
या विषय अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे साडू यांचे विरुद्ध एका महिलेने तक्रारी अर्ज दिलेला होता. तो तक्रार अर्ज यातील शिरसाठ या पोलीस कर्मचा-याकडे चौकशीसाठी होता. फिर्यादी व त्यांचे साडू यांचे वर कार्यवाही न करण्यासाठी तसेच तक्रार अर्ज मधून त्यांचे नाव वगळण्यासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सदरची पाच हजार रुपयाची लाच पंच साक्षीदारासमक्ष स्वीकारली. त्यानंतर आरोपी हेडकांस्टटेबल शिरसाठ यांच्या विरुध्द एमआयडीसी वाळूज औरंगाबाद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी करत आहे.