मनपा आयुक्तानी काय दिले आदेश पहा
औरंगाबाद / प्रतिनिधी - मनपा आयुक्तांनी शनिवारी लक्ष्मी कॉलनी, कोहिनूर कॉलनी, मुगल पुरा आदी भागात पाहणी केली. यावेळी त्यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला. यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक अन्सारी यांचा दोन दिेवसाचा पगार कपात केला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. या शिवाय महापालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गतही चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतू काही भागात अजूनही कचर्याचे सम्राज्य पसरलेले आहे. शनिवारी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हे खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यातील कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना लक्ष्मी कॉलनी, कोहिनूर कॉलनी, मुगल पुरा भागात रस्त्यावरच कचर्याचे ढीग साचल्याचे आढळून आले. यामुळे मनपा आयुक्तांनी संबंधितांच्या कामावर नाराजी व्यक्त करत वार्ड अधिकारी सुरडकर आणि स्वच्छता निरिक्षक अन्सारी यांना धारेवर धरत जाब विचारला. योग्य उत्तर न मिळाल्याने आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक अन्सारी यांचा दोन दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कचरा संकलन करणार्या वाहनास बोलावून घेत संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला.