औरंगाबाद नगर महामार्गावर वाहतुक कोंडी
उपाय योजना करण्याची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - औरंगाबाद शहराचा झपाटयाने विकास होत आहे त्याबरोबरच वाहनाची संख्या वाढत आहे पुणे, नगर, मुंबई या शहरात नागरीकांचे मोठ्या प्रमाणात जाणे येणे असल्यामुळे आता नगर औरंगाबाद महामार्गावर नियमित वाहतुकीची कोंडी होत असल्याचे वाळूज औद्योगिक परिसरात दिसून येत आहे वाहनधारकांना सर्वात जास्त त्रास हा शनिवारी आणि रविवारी सहन करावा लागत आहे वाहतुक कोंडीची समास्या सोडविण्यासाठी संबधी विभागाने त्वरीत उपाय योजना कराव्यात अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे़