उद्धव सेनेला गळती मराठवाडा सचिवांचा शिंदे सेनेत प्रवेश

उद्धव सेनेला गळती मराठवाडा सचिवांचा शिंदे सेनेत प्रवेश

संभाजीनगर /प्रतिनिधी - विधानसभेच्या परिणामा नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांची विश्वासहर्ता कमी झाली आहे. संभाजीनगर मध्ये विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एकही उमेदवार निवडून आला नाही आणि पुढे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे उद्धव सेनेला गळती लागली आहे.  संभाजीनगरच्या महत्त्वाच्या पदावरील उमेदवार हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि घोडेले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला
         मागच्या आठवड्यातच  माजी महापौर नंदकुमार घोडेले दाम्पत्याने शिंदेसेनेत प्रवेश केला आणि आता उद्धव साहेबांच्या जवळचे समजले जाणारे पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
आणखी अकरा ते बारा माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याची कुणकुण पक्षाच्या नेत्यांना लागली. तेव्हापासून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेतल्या. शनिवारी पक्षाचा मेळावाही आयोजित केला. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा