माहेश्वरी महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
संभाजीनगर/ प्रतिनिधी - सिडको हडको माहेश्वरी महिला मंडळाचा हळदी कुंकू व हुरडा पार्टीचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. महिलांनी विविध खेळ खेळत हुरड्याचा खूप आनंद लुटला.
यासह या मंडळाच्या नवीन कार्यकाळाची सुरुवात झाली. प्रीती झंवर यांची कार्यक्षमता आणि कुशलता पाहून सर्व सदस्यांनी प्रीती झंवर यांना अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून अध्यक्ष प्रीती झंवर यांनी संपूर्ण टीमसह पुन्हा कार्यकाळ हाती घेतला. सिडको हडको माहेश्वरी महिला मंडळाचा कार्यकाळ सांभाळण्यासाठी आपण सर्वांची निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वैशाली सोनी आणि प्रियंका बोरा यांनी कॅन्सरमुक्त सॅनिटरी नॅपकिन्सची माहिती दिली. जी सर्व महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित राहून महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे सचिव अनिता सोनी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कार्यकारिणी टीम कोषाध्यक्ष मधु करवा, सुवर्णा बाहेती, नीना भुतडा, रामा नावंदर, डॉ.पद्मा तोष्णीवाल, तृप्ती सोनी, मंजू गिल्डा, वैशाली झंवर, पल्लवी लड्डा, चंदा सोनी, अनुराधा मुंदडा, प्रतिमा सोनी, डॉ. सुलोचना जाजू, सरिता लड्ढा, नेहा भंडारी आदींनी परिश्रम घेतले.
मंडळाच्या अध्यक्षा प्रीती झंवर यांनी नवीन कार्यकाळासाठी सदस्यत्व घेऊन सदस्यत्व निश्चित करण्याचे आवाहन केले, जर कोणी अद्याप सदस्य बनले नसेल तर त्यांचेही मंडळात स्वागत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले..