शिक्षकांचे म्हसनवट्यात आंदोलन

शिक्षकांचे म्हसनवट्यात आंदोलन

औरंगाबाद / प्रतिनिधी : नवयुग क्रांती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे २ एप्रिल २०२२ पासून आंदोलनाचे ठरल्याप्रमाणे शासकीय नियम व अटींचे पालन करून मुकुंदवाडी। स्मशान भूमी औरंगाबाद येथे न बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा 1 पहिला दिवस, राज्यातील साठ हजार शिक्षकांना म्हणजेच अघोषित, त्रुटी पूर्तता अंशत: अनुदानित शिक्षकांना १५/११/२०११ व २४ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के अनुदान, अंशता अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण, वैद्यकीय परिपूर्ती योजना, जुनी पेन्शन योजना, बदनापूर येथे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल आदी मागण्यासाठी स्मशानभूमी मुकुंदवाडी औरंगाबाद येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्यात आले.

 नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे बसलेले आहेत. तसेच खैरे म्हणून राज्यातील ६० हजार शिक्षकांच्या सरांची माघील पाश्र्वभूमी बघता, संघटनेच्यावतीने १७ दिवस भिडे वाडा पुणे अन्नत्याग उपोषण, औरंगाबाद येथून सोळा दिवस मुंबईकडे अन्नत्याग पायी दिंडी, आमदार निवास मंत्रालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न (आमदार निवास वरून) अरबी समुद्र मुंबई जल समाधी, अनेक उपोषणाच्या माध्यमातून आणि राज्यातील इतर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनातून शासनाने पंधरा वर्षापासून चा प्रश्न सोडवलेला नाही. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्रीमहोदयांनी अनेक लेखी पत्र दिले त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही १५ वर्षापासून चा बिना वेतनाचा, अल्प बेतनाचा बनवास मुळे अक्षरश: शिक्षकांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आहे. 

आता शेवटचा उपाय म्हणून स्मशानभुमी मुकुंदवाडी औरंगाबाद येथे अन्नत्याग उपोषणाच्या माध्यमातून शासनाने विनाअनुदानित अंशता शिक्षकांच्या अनुदानित न्याय देण्यासंदर्भात कॅबिनेट निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणाच्या दरम्यान मृत्यू जरी झाला तरी माघार नाही अशी ठोस निर्णय खैरे यांनी घेतला आहे. तसेच मुकुंद चव्हाण कुलकर्णी विवेक राठोड पवार चंद्रकांत उपस्थित आहेत. तसेच राज्यातील साठ हजार शिक्षक खैरे पाठीशी आहोत असा ठाम पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा