कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभाराला कंटाळून व्यापार्यांचे बेमुदत बंद आंदोलन
गंगापूर / प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर येथे शनिवारी व्यापाऱ्यांच्या वतीने बेमुदत बंद आंदोलन करण्यात आले. बाजार समितीच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे आंदोलन करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आडत (मोंढा) व्यापारी यांच्या वतीने लिलाव पाडण्यात आला होता. आता आजपासून आठवडी बाजार आठ दिवस संपल्यानंतर सुरू झाला.
परंतु सोमवार पुन्हा पासून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बेमुदत बंदचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दोन व्यापाऱ्यांचे परवाना रद्द करण्यात आला होता. त्या व्यापाऱ्यांना पुन्हा परवाना देण्यात यावा याबरोबरच अन्य मागण्यासाठी आंदोलन केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केला.